संस्थापक :- श्री सदगुरू शंकर महाराज भक्त परिवार
पुणे, अंतापूर, नाशिक, मुंबई, सोलापूर, अ.नगर, कोल्हापूर, नागपूर दरमहा दुर्गाष्टमी निमित्त श्रींच्या दर्शनासाठी व पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसाद आणि आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येतो. श्रींच्या वार्षिक समाधी सोहळ्यानिमीत्त येणाऱ्या भक्तांसाठी ७ दिवस महाप्रसाद आणि आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येतो. महाशिवरात्री, गुरुपौर्णिमा, अश्विन नवरात्र, आषाढी एकादशी निमित्त उपवास फराळ आयोजित करण्यात येतो. सदगुरुंच्या अन्नदान सेवेत सहभागी होण्यासाठी श्री सदगुरु शंकर महाराज अन्नछत्र समिती, तसेच ज्या भक्तांना शिधा द्यावयाचा असेल त्यांनी कार्यालयीन क्रमांकावर संपर्क साधावा. (उदा. तांदूळ, मुगडाळ, तूरडाळ, तेल, रवा, साखर, तूप, मसाले इ.